सभापती श्री. केशरीचंद बालारामजी खंगारे
उपसभापती श्री. प्रमोद वामनराव आदमने
सचिव श्री. महेंद्र अशोकराव भांडारकर
सिंदी रेल्वे व सेलू बाजार समितीची स्थापना ११ ऑगस्ट १९४२ रोजी झाली असून त्हि समितीतील सिंदी येथे लिलाव शेडला विदेही "श्री संत सखुआई" व सेलू मधील "श्री संत केजाजी महाराज " ह्या नावाने ओळखल्या जातात. सेलूयेथे ई-ऑक्शन संगणीकृत लिलाव पद्धत्तीची अंमलबजावणी करण्यात आली समिती मधील घोडी काटे बंद करून इलेक्ट्रोनिक काट्याने मोजण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली .
सिंदी रेल्वे बाजार समितीने कापूस, तूर, सोयाबीन, गहू, चना , भुईमुंग शेंगा व गुरेढोरे इत्यादी शेतमालाचे नियमन केले आहे. मात्र या बाजारपेठेत कापूस, सोयाबीन, तूर चना, गहू ह्या शेतमालाची प्रामुख्याने आवक आहे. सिंदी रेल्वे बाजार समितीचे मुख्य यार्ड हे शहराचे मध्यभागी आहे. मुख्य यार्ड साई बाबा मंदिर जवळ 0.६० हेक्टर जागेत उभारण्यात आले असुन येथे बाजार समितीचा मुख्यालय उभारण्यात आले."समितीचे ग्रेन यार्ड " सिंदी मधील पिपरा रोडवर उभारण्यात आला असून तो समितीच्या मालकीच्या १.४१ हेक्टर जागेमध्ये व्यापलेला आहे. या व्यतिरिक्त समितीने सेलू येथे ५.१९ हेक्टर जागेवरती उपबाजाराची निर्मिती केली आहे.