१. सिंदी व सेलू येथे भारतीय कापूस निगम (सी सी आय ) खरेदी केंद्र. २. सोयाबीन, तूर, चना हमी दराने खरेदी करिता शासकीय खरेदी केंद्र ३. समितीद्वारे शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नियमित शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. ४. शेतकऱ्यांना थांबण्यासाठी विनामुल्य शेतकरी निवास उपलब्ध. ५. सेलू धान्य मार्केट मध्ये संगणकीय पद्धती द्वारे निलाव (ई-निलाव) ६. नैसर्गिक आपत्ती मध्ये वादळ व पूरग्रस्तांना मदत ७. शेतमालाच्या वजनासाठी इलेक्ट्रोनिक काट्याची व्यवस्था ८. उपबाजारपेठ सेलू मध्ये शेतकऱ्यांसाठी यांत्रिक व हस्त चलित धान्य चाळणीची व्यवस्था ९. हृदय शस्त्रक्रिया करिता शेतकऱ्यांना ५००० रु प्रमाणे आर्थिक मदत १०. सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा बैलांचे अपघाती मृत्यु झाल्यास (सर्पदंश , वीज , विद्युत प्रवाह ) रु १०,००० ची आर्थिक मदत ११. 15 कि मी वरील येणाऱ्या धान्य मालावर ५ रु प्रमाणे वाहतूक अनुदान |
|
---|