तारण योजना

शेतमाल विक्री करण्याची नका करू घाई ... शेतमाल तारण कर्ज योजना करेल कष्टाची भरपाई ...

१. सोयाबिन , तूर , गहू, हरभरा/चना या शेतमालाचा समावेश.

२. समाविष्ट शेतमालाचे बाजारभाव अथवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असणाऱ्या दरा नुसार होणाऱ्या एकूण किमतीचा ७५% पर्यंत तारण कर्ज त्वरित उपलब्ध

३. कर्जाचा व्याजदर केवळ वार्षिक ६%

४. तारण कालावधी : ६ महिने (१८० दिवस)

५. गोदाम भाडे व इतर खर्च बाजार समिती करणार

६.अधिक माहिती साठी बाजार समितीला संपर्क करा.


समितीचा तारण योजनेतील शेतकरी सहभाग व वितरित कर्ज

सन २०२१-२२ मध्ये समितीचा शेतमाल तारण योजनेत, समितीने शेतकऱ्यांना ७५% कर्ज रुपये ३,०९,९०६/ चे वाटप केलेले होते तसेच सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात समितीने ७५% कर्ज रुपये ४३,६१,१३४/- चे वाटप करण्यात आले. करिता शेतकन्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. समितीने मोठ्या प्रमाणात अवैद्य खरेदीवर नियंत्रण आणल्यामुळे बाजार आवाराच्या बाहेर होणाऱ्या खरेदीला आळा बसला आहे यात समितीचे मा. सभापती, मा. उपसभापती इतर पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वाट आहे.